वर्धा (प्रतिनिधी मनोज बाचले) – समुद्रपूर स्थानिक रवींद्रनाथ टागोर बहुउद्देशीय शिक्षण संस्था, पुलगाव द्वारा संचालित, मुक्ताबाई विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, समुद्रपूर तालुका- समुद्रपूर जिल्हा -वर्धा, येथे -5 सप्टेंबर 2020 शिक्षक दिन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी मुख्याध्यापक प्रशांत पांढरे प्रास्ताविक विनोद इंगळे सर यांनी केले, संचालन सुहास शिरपुरकर यांनी केले व आभार प्रदर्शन सौ. सुनिता गजभिये मॅडम यांनी केले. बहुतांश विद्यार्थी ऑनलाईन कार्यक्रमाला हजर होते, शाळेतील शिक्षकांनी खंडाळा या गावी जाऊन विद्यार्थी व पालकांशी संपर्क केला.तसेच ऑनलाइन शिक्षणासंबंधी त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. याप्रसंगी सौ जवादे सौ बुचे सौ कावळे कुमारी हागे श्री घुडे श्री तपासे श्री बाचले श्री शिरपुरकर श्री इंगळे श्री आडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीआदी उपस्थित होती.








