जळगाव जिल्ह्यात आणखी ५४ कोरोना बाधित रुग्ण

जळगाव – जिल्ह्यात कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेतलेल्या संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल आज (दि.१९) प्राप्त झाले असून, त्यात जिल्ह्यातील ५४ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीत जळगाव शहरातील १३, जळगाव ग्रामीण ७, भुसावळ ३, अमळनेर ६, पाचोरा १, धरणगाव ३, यावल ५, एरंडोल ७, जामनेर ३, रावेर ४, पारोळा १, बोदवड १ असा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०७४ इतकी झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here