महापालिका आयुक्तांची ठाणे कोविड हाॅस्पीटलला अचानक भेट : आयसीयू युनिटची केली तपासणी

ठाणे (प्रतिनिधी आमित जाधव) – ठाणे महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी आज अचानक महापालिकेच्या ठाणे कोविड हाॅस्पीटलला भेट देवून रूग्णालय व्यवस्थापन तसेच वैद्यकीय व्यवस्थापनाचा आढावा घेतला. दरम्यान त्यांनी तेथील आयसीयू युनिटची तपासणी करून तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला
आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी ठाणे कोविड रूग्णालयास अचानक भेट देवून तेथील डाॅक्टर्स यांच्याशी बोलून वैद्यकीय व्यवस्थापन कशा पद्धतीने सुरू आहे तसेच उपआयुक्त (आरोग्य) विश्वनाथ केळकर यांच्याकडून सर्वसाधारण रूग्णालय व्यवस्थापनाची माहिती घेतली. यावेळी रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. माळगावकर उपस्थित होते.
दरम्यान यावेळी महापालिका आयुक्तांनी रूग्णालयाच्या आयसीयू युनिटची तपासणी करून आयसीयू युनिटमध्ये किती रूग्ण उपचार घेत आहेत आणि किती बेडस् उपलब्ध आहेत याचा आढावा घेतला. तसेच या ठिकाणी उपचारासाठी येणा-या रूग्णांची कुठलीही गैरसोय झाल्याची तक्रार आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही महापालिका आयुक्तांनी यावेळी बोलताना दिला. यावेळी अतिरिक्त आयुक्त(२) संजय हेरवाडे हेही उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here