शहादा (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – नंदुरबार जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज अभिनेत्री व नेहमीच
आपल्या बिनधास्त व्यक्तवाने चर्चेत असणारी कंगना राणावत च्या विरोधात चप्पल मारून व तिच्या प्रतिमेला काळिमा फासून आंदोलन करण्यात आले .
कंगना राणावत ने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केल्याने तसेच मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या व्यक्तव्या वरून तिच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे . म्हणून आज नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने कंगना राणावत च्या प्रतिमेला चप्पल मारून काळे फासण्यात आले . कंगना राणावत हिने संजय राऊत यांच्या वक्तव्याचा विपरीत अर्थ लावून साहेबांचा अपमान केला आहे तसेच तिला मुंबईत राहण्याचा काहीही अधिकार नाही.कंगनाच्या वक्तव्याचा निषेध करतो. असे मत यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रीना पाडवी यांनी व्यक्त केले. ,नंदुरबार नगर पालिकेच्या नगरसेविका कल्यानी मराठे ,युवा मोर्च्या चे अध्यक्ष अर्जुन मराठे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.








