पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे विविध पोलिस अधिकाऱ्यांचा कोरोना योध्दा सन्मान

ठाणे (विशेष प्रतिनिधी) – पोलिस भरतीत पोलिसांच्या मुलांना 5 टक्के आरक्षण मिळवून देणारे जनक पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक रवी वैद्य, सिद्धार्थ डी जाधव प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य तथा होमगार्ड संघर्ष समिती यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील माजी होमगार्ड अधिकारी तसेच सतीश बनसोडे हे सामाजिक क्षेत्रामध्ये गरीब गरजूंना नेहमी मदत करत असतात अनेकांना त्यांनी उद्योग सुरू करण्यासाठी भरपूर प्रमाणात मदत केलेली आहे तसेच होमगार्ड मध्ये असताना त्यांना अनेक सन्मानपत्र पदक मानचिन्हे देऊन अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सन्मानित केलेले आहे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल म्हणून पोलीस बॉईज असोशियन तथा होमगार्ड संघर्ष समिती मार्फत धीरज पार्सेकर निवड समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसेच माजी तालुका समादेशक श्री.पैठणकर, अमोल माने प्रदेश अध्यक्ष मुंबई, अमोल पटेकर सरचिटणीस मुंबई यांच्या सूचनेनुसार सतीश बनसोडे ठाणे जिल्हा अध्यक्ष पश्चिम पदी नियुक्ती करण्यात येत आहे
सदर नियुक्ती ही श्रीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आली आहे तसेच या नियुक्ती कार्यक्रमांमध्ये कोरोना युद्धामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या पोलीस मित्र व समाजसेवक ,पत्रकार वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी यांना कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
श्रीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हे आपले कर्तव्य कोरोना काळात बजावत असताना स्वतः कोरोना पॉझिटिव्ह होऊनसुद्धा संपूर्ण बरे होऊन पुन्हा श्रीनगर पोलीस ठाणे येथे जॉइन झाले आणि आपले कर्तव्य चांगल्याप्रकारे बजावत आहे अशा कोरोना योद्ध्यांना पोलीस बॉईज असोसिएशन तथा होमगार्ड संघर्ष समिती यांच्या मार्फत कोरोना योद्धाने सन्मानित करण्यात आले तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले तसेच गुन्हे अन्वेषण विभाग दिनकर चंदनकर यांनासुद्धा कोरोना योद्धाने सन्मानित करण्यात आले या सर्व कार्यक्रमाच्या प्रमुख सुशील मोरे निवडसमिती कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य, किर्ती कुमार पटेल महाराष्ट्र संघटक यांनी या अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रम महिला आघाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे जिल्हा अध्यक्षा सौ.प्रमोदिनी कांबळे, सौ प्रीती खानेकर उपजिल्हाध्यक्ष ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here