महाबळेश्वर शिवसेना महिला आघाडीकडून कंगना राणावतने केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मिरशी करणारी व मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सवाल खडा करणारी बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्या दळभद्री वक्तव्याचा जाहीर निषेध महाबळेश्वर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने महाबळेश्वरातील सुभाषचंद्र बोस चौक येथे शनिवार, दिनांक ५ सप्टेंबर २०२० रोजी तीच्या फोटो बॅनरला जोडे मारो अंदोलनाने करण्यात आले. तसेच शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख राजा गुजर, युवा सेना शहरप्रमुख आकाश साळुंखे, तालुका प्रमुख राजश्री भिसे, लक्ष्मीताई मालुसरे, वनिता जाधव, महिला शहर प्रमुख उषाताई कोढाळकर, उपशहर प्रमुख सिमाताई सुतार, महिला शाखा प्रमुख प्राजक्ता ताई धनावडे, शहर संघटक गोविंद कदम, उप शहर प्रमुख आकाश ढेबे राहुल शेलार, विभाग प्रमुख राजेंद्र पंडित, दत्ता भाऊ बावळेकर, शंकर ढेबे, बंडू फळणे, राजेश सोंडकर, शाखा प्रमुख निलेश धनावडे, शहनवाज खारखंडे, प्रमोद पवार, आशोक मामा शिंदे, अलिभाई वारूणकर, जितेश कुंभारदरे, दिलीप भाऊ चिकणे, महिला आघाडी सुवर्णा उगले, कल्पना कदम, मनिषा मोरे, कांता कदम, निलिमा शेडगे, वंदना बिरामणे, इंदुमती धनावडे, राजश्री मोरे, रोहिणी लांगी, संगीता लांगी, नंदा धनावडे आणि महिला आघाडी, शहर शिवसेना युवासेना आजी माजी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कंगना राणावत जर ९ सप्टेंबरला महाराष्ट्रात आली तर तीचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही रणरागिणी शांत बसणार नाही असे उपस्थित महिला आघाडीच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here