शतकमहोत्सवी पी. आर. हायस्कूलचे अभियान : शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी..!!

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – शतकमहोत्सवी पी.आर. हायस्कूलचे इंग्रजी विषयाचे व्यासंगी तथा उपक्रमशील ज्येष्ठ शिक्षक श्री. के. आर. वाघसर यांनी ‘ शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारी ‘ या पी.आर. हायस्कूलच्या अभियानांतर्गत आज मोठा माळीवाडा समाज मढी मध्ये इयत्ता दहावीच्या जवळ जवळ विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केले.
आॅनलाईन शिक्षण पद्धतीत त्यांना येणाऱ्या अडचणी आणि कोरोना काळात घ्यायची काळजी याविषयी चर्चा केली.शाळा बंद असल्याने घरी राहून विद्यार्थी अक्षरशः कंटाळून गेले आहेत, त्यांना शाळेची खूप ओढ लागली आहे. अशावेळी नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा ध्यास घेणार्‍या आणि सदैव विद्यार्थी केंद्रीत असलेल्या पी.आर. हायस्कूल या शाळेने प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यत जाण्याचे अभियान सुरू केले आहे. या अभियानामुळे मुलं ही आनंदली आहेत आणि पालक ही समाधान व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here