यह राजनीती है भाई … पब्लिक सब जानती है
जळगांव (संपादक सुनिल पाटील) – मागील काही वर्षापूर्वी दुबई मधून आमचे पूर्वीचे लोकप्रिय नामदार एकनाथराव खडसे यांना दाऊद इब्राहिमच्या पत्नीने फोन केला म्हणून आमचे लोकप्रिय मंत्री एकनाथरावजी खडसे यांना राजी नामा द्यावा लागला.
आज तर त्या भगोड्या दाऊदच्या हस्तकाचा फोन आला की मुख्यमंत्री व मातोश्री ला उडवून देऊ.. योगायोग म्हणा की दोनच दिवसापूर्वी एकनाथराव खडसे बोलले की त्या हॅकर चौधरीला कोणा मंत्र्यांचा पी ए भेटत होता, माहिती देत होता व तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस त्याला कसे भेटले होते. या पार्श्वभूमीवरून महाराष्ट्र सरकार व खास करून मुंबई पोलिसांनी आजच्या धमकीचा व त्या फोनचा छडा ४८ तासात लावावा व खरा आरोपी समोर आणावा. राजकीय मतभेद असावे परंतु राजकारणसुद्धा चांगले प्रकारे करावे म्हणून एका कवीने खूप चांगले म्हटले आहे की,
दुश्मनी जमके करो पर इतनी गुंजाईश रहे ।
जब कभी हम दोस्त बनजाये तो शर्मिन्दा ना हो ।।
आम्ही त्या दाऊद हस्तकाचा जाहीर निषेध करून चौकशीची मागणी महामनियार बिरादरीचे प्रदेशाध्यक्ष फारुक शेख अब्दुल्ला यांनी केले आहे.







