नाशिक (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील सद्यस्थितीत बेड शिल्लक नाहीत, ही कृत्रिम समस्या निर्माण झाली आहे. गरीब असणाऱ्या लोकांना ऍडमिट करून घेतले जात नाही. श्रीमंत असणाऱ्या लोकांना फक्त ऍडमिट केलं जातं त्यांनाच फक्त बेड उपलब्ध होतात असा आरोप भाजपा युवा मोर्चा चे पदाधिकारी तन्मय गांगुर्डे यांनी केला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर करोनाच्या सोबतच हृदयविकार, पक्षघात, डायलिसिस मुळे उद्भवणारी गंभीर परिस्थितीमुळे महाराष्ट्रात सर्वच भागातून दररोज शेकडो नागरिक मिळेल त्या वाहनाने प्रत्येक हॉस्पिटलला रुग्णास एडमित करण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र प्रत्येक हॉस्पिटलमध्ये त्याना नकार पचवावा लागतो. त्यातील काहींना रस्त्यात मृत्यू आल्याचे सत्य सामन्य माणसाला किंमत नसल्याचे अधोरेखित करते. अशी काही उदाहरण नाशिकशहरात पाहण्यास मिळाली, रुग्णाचे नाव,आडनाव,गरीब असल्याचा पेहराव पाहून त्यांच्याकडून रोख रक्कम मिळणार नाही अशी खूणगाठ ठरवून श्रीमंत वाटणाऱ्या, दिसणाऱ्या नागरिकांना ऍडमिट करण्यावर हॉस्पिटल चालकांनी भर दिल्याचे दिसून आले आहे.
महाराष्ट्रातील सर्वेच महानगरपालिका,नगरपालिका,नगरपंचायत,आणि राज्यसरकारला हॉस्पिटलस जुमानत नाहीत तसेच नियंत्रण देखील नाही.पैसे नसतील तर मारायला तयार राहा. अशी व्यवस्था निर्माण करणाऱ्या हॉस्पिटल मालक व चालक यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री मा.राजेशजी टोपे यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे. असे भाजपा युवा मोर्चा चे पदाधिकारी तन्मय गांगुर्डे यांनी महाविकासआघाडी सरकारकडे केली आहे.







