जिल्ह्यात ७७३ कोरोनाबाधित तर ४६३ रुग्ण कोरोनामुक्त
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज (दि.६) प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात ७७३ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक १९६ कोरोनाबाधित अमळनेर तालुक्यात आढळून आले आहे. त्यामुळे आज एकूण कोरोनाबाधितांची संख्या 32 हजार 433 झाली आहे.
आज आढळलेल्या ७७३ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर ४२, जळगाव ग्रामीण ५, भुसावळ ६८, अमळनेर १९६ , चोपडा ६९, पाचोरा ७४, भडगाव १६, धरणगाव २९, यावल ३८, एरंडोल ३६, जामनेर ४६, रावेर ७५, पारोळा ३६, चाळीसगाव २५, मुक्ताईनगर ६, बोदवड १०, इतर जिल्ह्यातील १ अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर , भुसावळ या तालुक्यांत प्रत्येकी ४ तर जळगाव ग्रामीण, भडगाव, जामनेर, मुक्ताईनगर, अमळनेर तालुक्यातील प्रत्येकी एका कोरोनाबाधिताचा समावेश असल्याची माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे







