युट्युबच्या चॅनल ‘मराठी नजराणा’तर्फे माहितीपर व्हिडीओंचे प्रसारण

जळगाव – येथील रंगकर्मींच्या माध्यमातून ‘मराठी नजराणा’ (marathi najarana) नावाचे युट्यूब चॅनल सुरु करण्यात आले असून, इतिहासातील प्रसिध्द व्यक्तींचा इतिहास व्हिडीओच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा त्यांचा उद्देश आहे. सध्या या चॅनलची चर्चा होत असून, त्यावरील व्हिडीओ सोशल मिडीयाच्या विविध माध्यमातून फिरत आहेत.
याबाबत अधिक माहिती घेतली असता, ‘मराठी नजराणा’तर्फे सांगण्यात आले की, नवीन शालेय अभ्यासक्रमातील इतिहास बदलला असल्याने, अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्वांविषयी तसेच साहित्यिकांविषयी वा महाराष्ट्रात होऊन गेलेल्या अनेक थोर व्यक्तिमत्वांविषयी विद्यार्थ्यांना माहितीच होत नसते. त्यामुळे या व्यक्तिमत्वांची माहिती सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी या चॅनलचा माध्यम म्हणून वापर करण्याचा त्यांचा मानस आहे.
सध्या या चॅनलवरील व्हिडीओ सोशल मिडियाच्या व्हॉटस्‌ॲप, फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून फिरत आहेत. आजवर या चॅनलतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सानेगुरुजी, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याविषयी माहिती सांगण्यासोबतच अनेक वेगळ्या विषयांना हाताळण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here