मुंबई – आज दि. 19 जून, 2020 रोजी धडक सलून, पार्लर व स्पा ओनर्स असोसिएशनच्यावतीने व कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली धडक सलून, पार्लर व स्पा ओनर्स असोसिएशनच्या सर्व मालकांतर्फे असोसिएशनचे पदाधिकारी रेखा चैधरी, हेना शाह यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगराचे पालक मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्याबरोबर विक्रम भट्ट यांच्या द्वारे होस्ट केलेली झुम अॅपव्दारे व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून सलून, पार्लर व स्पा मालकांचे लॉकडाऊनचा काळातील व येणा-या पुढच्या लॉकडाऊनच्या नंतरच्या काळातील प्रश्न व समस्या त्यांच्या समोर मांडल्या.
देशात व राज्यात कोविड-19 मुळे महामारी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने केलेल्या लॉकडाऊनमुळे सलून, पार्लर व स्पा मालकांवर मोठे आर्थिक संकट आलेले आहे. बहुसंख्य सलून, पार्लर व स्पा हे भाडे तत्वावर घेतलेले आहे. लॉकडाऊनमुळे सलून, पार्लर व स्पा हे पूर्णतः बंद करण्यात आले. त्यामुळे सलून, पार्लर व स्पा मालकांवर मोठे आर्थिक संकट आलेले आहे. काही सलून, पार्लर व स्पा मालक हे कर्जबाजारी झाले आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्यजी ठाकरे यांच्याबरोबर झुम अॅप व्दारे झालेल्या व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगमध्ये सलून, पार्लर व स्पा इंडस्ट्री परत सुरु करावी, त्यामध्ये सलून, पार्लर व स्पामध्ये आम्ही सुरक्षितेचे सर्व नियम पाळून व्यवसाय व्यस्थित प्रशिक्षित व कुशल कारागीरांकडून काम करुन घेऊ., तसेच सलून, पार्लर व स्पा मालकांकरिता आर्थिक मदतीचा दिलासा मिळणारे मोठे पॅकेज आपण जाहीर करावे, अशा मागण्या धडक सलून, पार्लर व स्पा ओनर्स असोसिएशनतर्फे करण्यात आल्या.
Home Uncategorized पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंशी धडक सलून, पार्लर व स्पा ओनर्स असोशिएशनतर्फे ऑनलाईन...






