निसर्ग मित्र समितीतर्फे शिक्षकांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान

धुळे (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळे तर्फे शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या पाच शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून सन्मान पत्र , शॉल,पुस्तक,वृक्षरोप,देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळे तर्फे सामाजिक, शैक्षणिक , राष्ट्रीय एकात्मता,कृषी व पर्यावरण क्षेत्रात कार्य करीत आहे,शैक्षणिक उपक्रम अंतर्गत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आदर्श शिक्षकांचा सन्मान व्हावा या उद्देशाने ५ सप्टेंबर माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमिताने निसर्ग-मित्र समिती च्या कार्यालयात संस्थापक प्रेमकुमार अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली पाच आदर्श शिक्षकांचा कोरोना योद्धां म्हणून सन्मान करण्यात आला,यावेळी भारताचे माजी राष्ट्रपती कै. माननीय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या निमिताने प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
निसर्ग-मित्र समिती तर्फे कोरोना या महामारीत जिवाची पर्वा न करता गरीबांना योग्य सहकार्य व मदत केल्याबद्दल
महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे प्रदेश सरचिटणीस माननीय मा. प्रल्हाद साळुंके सर, धुळे, ओबीसी संघाचे माननीय विलासराव पाटील, आदर्श राज्य पुरस्कार विजेते मा. प्रा. डॉ. प्रवीण नेरपगार, पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष.मा. भुपेश दादा वाघ, केंद्रप्रमुख, मा. ताईसो.नुतन हंसराज पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक कोरोना योद्धां म्हणून सन्मान पत्र,शॉल,पुस्तक, वृक्षरोप, देऊन,फेटा बांधुन सन्मानीत करण्यात आले.तर प्राचार्य भिकाजी देवरे सर,प्रा गोकुळ तुकाराम पाटील-सर यांचा वाढदिवस निमिताने विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धुळे शहर संपर्क-प्रमुख वैभव पाटील,शिंदखेडा तालुकाध्यक्ष संपर्क-प्रमुख सुधीर सनेर सर, पाटील, ,संघटक शिवाजी बैसाणे, अमोल पाटील,कार्यालयीन सचिव निसर्ग अहिरे,यांनी विशेष परिश्रम घेतले,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन समितीचे राज्य महा सचिव संतोषराव आबा पाटील- तर आभार प्रदर्शन शिंदखेडा तालुकाध्यक्ष आर आर सोनवणे सर यांनी केले, अशी माहिती जिल्हाध्यक्ष डी बी पाटील व -जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ प्रविणसिह गिरासेे यांनी पत्रकांनवे दिली आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here