सुफी फाऊंडेशनतर्फे रक्तदान शिबिरचा यशस्वी समारोप

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – रविवार दि ६ सप्टेंबर रोजी मोहरम निमीत्ताने सूफी फाऊंडेशन, ने आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यांनी ५० पिशवी संकलनाचा संकल्प करून तो पुर्णही केला. ते रक्त ज्या लहान मुलांना दुर्धर आजार झाले आहे त्यांना दिले जाईल.
पोलिस सेवा संघटनेच्या पदाधिकार्यानी तेथे सदिच्छा भेट दिली व त्यांच्या कडून संपुर्ण प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. भविष्यातही असेच समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करत रहा अशा शुभेच्छा दिल्या.
पोलिस सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री भावेश ठाकुर व महिला जिल्हा अध्यक्षा श्रीमती शितलताई जडे यांच्या हस्ते अध्यक्ष हाजी शकीर खटिक यांचा सत्कार करण्यात आला. त्या प्रसंगी तिथे रायसोनी इन्स्टिट्यूट चे विभाग प्रमुख प्रा रफिक शेख, पोलिस सेवा संघटनेचे शहरअध्यक्ष श्री अतुल बोंडे, युसुफ शाह (अल-खैर ट्रस्ट), जमिल खान, ड्रॉ. जोयेब खटिक, शेरू भाई, नजिम शेख, AK ग्रुप के अकील भाई, अल्लाह शेख, आरोग्यदुत मंसुर बावा, सइफ्फोदिन पिंजारी (सैफो पेंटर) आदि उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here