पोलीस सेवा संघटना महाराष्ट्र राज्यतर्फे शिक्षकदिनी शिक्षकांचा सन्मान

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – गुरु बिन ज्ञान नही हे प्रचलित वाक्य आपल्याला आपल्या शिक्षणाची खरी ओळख करुन देते.आणि आपल्या समाजाला, देशाला, आपल्या व्यक्तिमत्वाला घडवणारे, आकार व योग्य दिशा देणारे प्रभावी दुवा म्हणजेच आपले शिक्षक . शिक्षक हा चोवीस तास सेवेसाठी तत्पर असतो. हे कोविड च्या भयानक स्थितीत ही शिक्षकानी सिद्ध केले.
५ सप्टेंबर डॉ राधाकृष्णनन सर्वपल्ली यांच्या स्मृतिदिना प्रित्यर्थ शिक्षक दिनाचे औचित्य साधून जळ्गाव पोलीस सेवा संघटनेने काही सेवाभावी व ज्ञानरूपी शिक्षकांचा सन्मान करुन त्यांच्या कार्याला मानवंदना दिली. कोविड च्या वाढत्या प्रादुर्भावात ही सर्वच शिक्षकांनी ऑनलाइन तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले. या प्रसंगी श्री स्वामी समर्थ विद्यामंदिर कुसुंबा खुर्द., चे मुख्याध्यापक ( श्री हेमंतकुमार सोनार, ) या.दे . पाटील माध्यमिक विद्यालय मेहरूण येथील शिक्षिका (श्रीमती वर्षा आबासाहेब अहिरराव, ) आर. आर विद्यालय चे शिक्षक (श्री टी.बी.पांढरे सर ), शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्च मा. चे शिक्षक श्री रामकृष्ण काशिराम पाटील, व विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल चे प्रभावी मुख्याध्यापक( श्री ज्ञानेश्वर युवराज पाटील सर) यांचा सत्कार पोलीस सेवा संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने संस्थापक अध्यक्ष्य श्री प्रकाश डोंगळे व उपाध्यक्ष धर्मेंद्र अग्रवाल सर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे जिल्हाअध्यक्ष श्री भावेश ठाकुर, यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला या प्रसंगी शिक्षक भारती संघटना व पोलीस सेवा संघटनेच्या जिल्हा महिला अध्यक्षा श्रीमती शितलताई जडे, शहरअध्यक्षा सौ भारतीताई पाटील, शहराध्यक्ष श्री तिलोत्तमदास (अतुल) बोंडे , सदस्य कुणाल संजय जडे, हेमंत गालफाडे, ओमप्रकाश राठोड, रेहान खान सर उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here