गारपीट व वादळी पावसाने नुकसान झालेल्या गावांची खा.डॉ.हिनाताई गावित यांनी केली पाहणी

नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि.कुबेर जाधव) – चिकसे – साक्री तालुक्यात दि.४ व ५ सप्टेंबर रोजी गारपीट व वादळी पावसामुळे उंभरे, देगाव, दिघावे, शेवडीपाडा, उंभर्टी आदी गावांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले होते. झाडांच्या

पिंपळनेर, उमरे परीसरात दोन तीन दिवसांपूर्वी पावसामुळे उभ्या पिकांचे, तसेच शेडनेट ,कांदा चांदीचे प्रचंड नुकसान झाले आहे , त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकविलेल्या व काढणीला आलेल्या मिरची , टमाटे, लाल कांदे, बाजरी, मका , कडधान्ये यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून महसूल विभाग, कृषी विभाग यांनी तातडीने शिवारात जावून वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी प्रशासनाकडे केली आहे.

पडझडीमुळे काही घरांचेही नुकसान झाले तसेच उंभरे येथील शेतकरी विलास पाटील यांच्या शेडनेटचे तसेच प्रवीण अहिरे, भीमराव अहिरे यांच्या पपई बागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. गारपीट, वादळ व मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेत शिवारांची पाहणी करण्यासाठी नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय मा. खा. डॉ.हिनाताई विजयकुमार जी गावित यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला.
या वेळी मका, सोयाबीन, बाजरी, ऊस ही पिके जमिनदोस्त होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे दिसून आले सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार हिनाताई गावित यांच्या नुकसानग्रस्त शिवारांच्या भेटीदरम्यान धुळे जि. प. सदस्या सुमित्राबाई गांगुर्डे, जि. प. सदस्य विजय ठाकरे, वसंतराव घरटे, उत्पल नांद्रे, सुधिर अकलाडे, मनोज चौरे, शैलेंद्र आजगे, प्रकाश अकलाडे, बन्सी ठाकरे, माधवराव शेवाळे, सोपान शेवाळे, प्रविण अहिरे, कैलास अहिरे, रमण पानपाटील, अनिल अहिरे यांसह तलाठी श्रीमती रुपाली अहिरे, उंभरेच्या पो. पा. स्मृती अहीरे उपस्थित होत्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here