जळगाव (संपादक सुनिल पाटील) – नुकतेच नाशिकच्या पोलिस आयुक्तीपदी नियुक्ती झालेल्या दिपक पांडेय यांचे दक्ष पोलिस टाईम्सतर्फे संस्थापक तथा सरपंच विजय टाटिया यांनी दक्ष पोलिस टाइम्स्चा अंक देवून स्वागत केले. याप्रसंगी कार्यकारी संपादक राकेश पाटील हे ही उपस्थित होते.
नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. मुंबईत सुधार सेवाचे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून काम पाहणाऱ्या दीपक पांडेय यांची नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे, म्हणून दक्ष पोलिस टाईम्सतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.
Home उत्तर महाराष्ट्र नाशिक नाशिकचे नवनियुक्त पोलीस आयुक्त दिपक पांडे यांचे दक्ष पोलिस टाईम्सकडून स्वागत







