जळगाव (संपादक सुनिल पाटील) – शहरातील क्रीडा क्षेत्रातील कुशल संघटक, उदयोन्मुख नेतृत्व व सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करणारे उपक्रमशील खुबचंद सागरमल विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व जळगाव जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे सहसचिव प्रविण पाटील यांना जिल्हा परिषद (माध्यमिक) विभागाचा जिल्हास्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे चोपडा तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच धनाजी नाना कॉलेजचे प्राचार्य श्री.वाघुळदे व प्रा.पी.आर. चौधरी यांनी त्यांचा सत्कार केला आहे.








