कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – जिल्ह्यात गेल्या 24 तासांत आणखी 32 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 916 झाली आहे. दिवसभरात आणखी 955 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, तर 425 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजअखेर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 30 हजार 34 झाली असून, आतापर्यंत 18 हजार 876 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात सापडलेल्या कोरोनाबाधितांमध्ये शहरातील 361 जणांचा समावेश आहे.
दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण आणि मृत्यू संख्या वाढू लागल्याने कोल्हापूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे. सीपीआरच्या औषधशास्त्र विभागाचे सहायक प्रा. डॉ. विजय बरगे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. डॉ. बरगे यांच्यावर सीपीआरमधील बाधित रुग्णांची मोठी जबाबदारी होती.
सोमवारी मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 26 पुरुष, तर 6 महिलांचा समावेश आहे. कोल्हापूर शहरात 10, हातकणंगले 7, करवीर 5, शिरोळ 4, कागल 2, राधानगरी, गडहिंग्लज, हुक्केरी, तासगाव येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. रविवारी मध्यरात्री 1 वाजता गडहिंग्लज येथे 3 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सोमवारी सकाळी सव्वाअकरा वाजता शिरोळ, पन्हाळा, हातकणंगले येथील प्रत्येकी एका रुग्णाचा अहवाल बाधित आला. 11.30 वाजता 25 आणखी बाधितांची भर पडली आहे. यात शहरात 10, करवीर 8, हातकणंगले 7 जणांचा समावेश आहे. 11.45 वाजता शहरात 19, करवीर 7, कागल 3, शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्ण आहे.
दुपारी 12 वाजता 32 बाधितांची भर पडली असून, यामध्ये शहर 17, करवीर व शिरोळ प्रत्येकी 7, तर हातकणंगले तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दुपारी 1.30 वाजता 23 आणखी बाधित आढळले. यात शहरात 13, करवीर 5, राधानगरी 2, तर हातकणंगले, पन्हाळा व जिल्ह्याबाहेरील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. 3.45 वाजता कागल 2 व शहरात 7 जण, तर 4.15 वाजता शिरोळमध्ये 27 व शहरात एकजण बाधित आढळला आहे. 4.30 वाजता राधानगरीत 23, हातकणंगलेत 3, तर शहरात 2 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वैद्यकीय तपासणीत पुढे आले.
सायंकाळी 5 वाजता शहरातील तिघांचे व हातकणंगलेमधील पाचजणांचे अहवाल बाधित आले आहेत. 5.15 वाजता आजरा तालुक्यात दोघे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 6 वाजता तब्बल 263 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. यात शहरातील 106, अन्य जिल्ह्यातील 29, हातकणंगले 34, गडहिंग्लज 19, पन्हाळा 17, शिरोळ 25, कागल 8, तर चंदगड, राधानगरी, आजरा, गगनबावडा, शाहूवाडी, राधानगरी तालुक्यात प्रत्येकी एकाचा समावेश आहे. 6.30 वाजता 31 बाधितांची भर पडली. यात हातकणंगले 14, पन्हाळा 9, शिरोळ, करवीर प्रत्येकी 1, तर जिल्ह्याबाहेरील 2 जण आढळले आहेत. याच वेळेस पुन्हा 29 जणांचे अहवाल बाधित आले आहेत. यात शहरातील 15, कागल, शाहूवाडी प्रत्येकी 2, करवीर व अन्य जिल्ह्यातील प्रत्येकी चार, राधानगरी व हातकणंगले तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीला संसर्ग झाला आहे. सायंकाळी 7 वाजता चंदगड 5, हातकणंगले व शाहूवाडीत प्रत्येकी 4, कागल, शहरात, भुदरगड, राधानगरी, पन्हाळा तालुक्यात प्रत्येकी एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाली आहे. 7.45 वाजता गडहिंग्लज तालुक्यातील 17, भुदरगड 2, शहरात 8 जणांचे अहवाल बाधित आले आहेत.
जिल्ह्यात दिवसभरात 1,562 जणांची कोरोनाची प्राथिमक तपासणी झाली असून, यामध्ये आरटी-पीसीआर, सीबीनॅटसाठी 1,470 तर अँटिजेनसाठी 723 जणांचे स्वॅब घेतले आहेत.







