कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग

नाशिक (प्रतिनिधी) – महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये सफाई कर्मचाऱ्याने कोरोनाचा उपचार घेणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयितां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुग्णालयातील सफाई कर्मचारी कैलास बाबुराव शिंदे (वय.५६) असे संशयित आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी मनपाच्या डॉक्टरांनी फिर्याद दिली आहे. पीडित महिला कोरोनाची लागण झाल्याने ४ तारखेपासून डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल झाली. या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना आज, मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पीडित महिला स्वछता गृहात गेली. यावेळी संशयित आरोपी शिंदे याने महिलेचा पाठलाग केला. यावेळी मद्याच्या नशेत असलेल्या संशयिताने महिलेचा विनयभंग केला. या घटनेची माहिती पीडित महिलेने डॉक्टरांना दिली. डॉक्टरांनी चौकशी केली असता, या घटनेत तथ्य आढळून आले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here