जालना (विशेष प्रतिनिधी ) – जालना जिल्ह्यातील पानशेंद्रा हत्याकांडातील पिडीत जखमी कुटुंबाची शासकीय रुग्णालय जालना येथे वंचित बहुजन आघाडीचे पार्लीमेंट्री बोर्ड सदस्य तथा भारिप बहुजन महासंघ प्रदेश अध्यक्ष अशोक सोनोने यांनी भेट घेतली त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच संबंधित डॉक्टरांना सुद्धा चांगले उपचार करण्यासाठी सांगितले, तसेच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि संपूर्ण वंचित बहुजन आघाडी आपल्या दुःखात सहभागी असून, आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही बोर्डे कुंटबीयांना अशोक सोनोने यांनी दिली. यावेळी वंचित बहुजन आघाडी व सम्यक विद्यार्थी आंदोलन जालनाचे पदाधिकारी उपस्थित होते.








