महा कला मंडळाच्या दावणीला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ बांधण्याचा प्रयत्न

महा कला मंडळाचा पर्दाफाश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – नाटक, चित्रपट, शाहिरी लोककला आदी कलाक्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांची महा कला मंडल नावाची शिखर संस्था ऑगस्ट२०२० महिन्यात स्थापन करण्यात आली आहे यामध्ये सामील असलेल्या ज्या काही संस्था आहेत त्या यादीत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही चित्रकर्मींची मातृसंस्था आहे. या संस्थेच्या निर्मितीचे बीज चित्रपती व्ही.शांताराम आणि चित्रमहर्षी भालजी पेंढारकर, ग दि माडगूळकर, तात्या आंबपकर, बाळ गजबर, सुलोचना चव्हाण, चारुदत्त सरपोतदार, सुभाष भुरके, अनंत माने, सुधीर फडके , विनायक सरस्वते या सारख्या अनेक मातब्बर लोकांनी रोवले आहे. संस्थेचे रजिस्ट्रेशन अंडर पब्लिक ट्रस्ट अक्ट १९५० रजि.नं एफ-१२७(कोल्हापूर) ॲन्ड अंडर सोसायटी रजि.ॲक्ट रजि.नं.बोम्बे/२०५/कोल्हापूर इस्टेब्लिशड ऑन ९/११/१९६६. या सालीचे आहे. पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या या संस्थेची स्वतंत्र घटना आहे आणि त्या घटनेत नमूद केलेली संस्थेची धेय्य व उद्दिष्टे आहेत , सभासद संख्या सुमारे 45000 हुन अधिक असू न संस्थेचे चित्रपट कामगार पासून ते चित्रपट निर्माते पर्यंत सभासद असणारी अशी एकमेव संघटना आहे.
संस्थेच्या घटनेचे पालन करणे ही संस्थेशी निगडीत असलेल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. महा कला मंडल या संस्थेच्या आधीन राहून कार्य करण्याचा निर्णयाला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कार्यकारिणीची संमती घेण्यात आली आहे का? महा कला मंडल या संस्थेसोबत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने कार्य करावे यासाठी महामंडळाच्या सभासदांची संमती आहे का? असे नसेल तर याबाबत संबंधितांवर कार्यवाही व्हायला हवी अशी सर्व सभासदांची मागणी आहे. महामंडळाच्या घटनेतील नियम बाजूला ठेवून निर्णय घेण्याचा अधिकार कुणालाही नाही महामंडळाच्या एखाद्या सभासदाने विद्यमान कार्यकारिणीच्या कार्यप्रणाली बाबत प्रश्र्न विचारला तर त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली जाते व त्यात सभासदत्व रद्द करण्याची धमकी दिली जाते संख्या बळाच्या जोरावर हुकूमशाही कारभार चालू आहे.
महामंडळ अध्यक्षांचा विशेष अधिकार असे सांगत आणि त्याचा वापर करीत संस्थेत विविध पदे निर्माण करण्यात येत आहेत अनेकांच्या नेमणुका करीत त्यांना संस्थेचे पत्र देण्याचा उद्योग संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मेघराज भोसले करीत आहेत. विद्यमान अध्यक्षांच्या कार्यकाळात संस्थेत अनेक समित्यांची स्थापना करुन आपल्या मर्जीतील लोकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. नेमणूका केल्या पण नेमलेल्या प्रतिनिधींनी काय व कसं कार्य करायला हवं हे सांगण्याची तसदी मात्र अध्यक्ष किंवा इतर पदाधिकारी यांनी घेतली नाही.
मग हा घाट का घातला गेला?
या सर्वांना खुश करुन,येऊ घातलेल्या महामंडळाच्या पंच वार्षिक निवडणुकीत यांचा आपल्या साठी वापर हा उद्देश आणि निवडणुक जिंकणे हे उद्दिष्ट.महामंडळाच्या धेय्य आणि उद्दिष्टांचा विसर विद्यमान अध्यक्षांना पडला आहे साडेचार वर्षांच्या कार्य काळात चित्रपट व्यवसाय टिकण्यासाठी व वाढविण्यासाठी काहीही प्रयत्न केले गेले नाहीत
सरकार दरबारी चित्रपट व्यवसायातील अडचणी विषयींच्या प्रश्र्नांचा पाठपुरावा झाला नाही. सरकार दरबारी आता पाठपुरावा चालला आहे तो महा कला मंडल या संस्थेसाठी.महाराष्ट्रातील अनेक संस्था एकत्र करुन कलाकारांचे भलं करण्याचा ,सरकार दरबारी त्यांचे प्रश्र्न मांडण्याचे आश्र्वासन दिले जातय स्वयं घोषित अध्यक्षांचे या मागचे धेय्य आणि उद्दिष्ट इतर संस्थांच्या प्रतिनिधींना समजत नाहीय अशा गैरसमजात स्वयं घोषित अध्यक्षांनी राहू नये.
अनेक संस्थांना हाताशी धरुन त्यांच्या माध्यमातून आपली राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या आमदारकी साठी चालू असलेली मोहीम सगळयांना माहीत आहे.कलाक्षेत्राचा आपल्याला पाठिंबा आहे आणि कलाक्षेत्रात आपण किती कार्यरत आहोत हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाला दाखविण्याची आपली धडपड ही मंडळी जाणून आहेत.
चित्रीकर्मीची मातृसंस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा मान मिळवूनही या संस्थेचे कार्य न करु शकलेली व्यक्ती, ज्याच उद्दिष्ट व उद्देश फक्त खुर्ची मिळवणं आणि स्वत:च भलं करणं आहे तो आपल काय भलं करणार याचीही कल्पना या प्रतिनिधींना आहे. शितावरुन भाताची परीक्षा करण्या एवढे सगळेच हुषार आहेत याची आपणही नोंद घ्यावी.
अ.भा.म.चि. महामंडळ ही शिखर संस्था असून शासन मान्य असून या माध्यमातून अनेक प्रश्न संस्थेने मांडून शासन दरबारी मान्यता घेतली आहे. गेली पन्नास वर्षे ही संस्था कार्यरत आहे. पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या या संस्थेची स्वतंत्र घटना आहे आणि त्या घटनेत नमूद केलेली संस्थेची धेय्य व उद्दिष्टे आहेत
आपल्या उद्दिष्ट पूर्तीसाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दुसऱ्या संस्थेच्या दावणीला बांधण्यांचा आपला हेतू महामंडळाचा सभासद कधीही सहन करणार नाही, असे अ.भा. मराठी चित्रपट महामंडळाचे संचालक रणजित जाधव यांनी सांगितले.

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here