संविधान जनजागृती: फ्री लीगल एड क्लिनिक, अस्मिता कॉलेज ऑफ लॉचा अभिनव उपक्रम

मुंबई ( संपादक सुनिल पाटील) : शुक्रवारी दिनांक २६-११-२०२१, संविधान दिनानिमित्त मुंबई मधील विक्रोळी येथील अस्मिता कॉलेज ऑफ लॉ च्या फ्री लीगल एड क्लिनिक विभागाने शहरातील सरकारी व खाजगी कार्यालये, हॉस्पिटले, सामाजिक संस्था, शाळा, सहकारी गृहनिर्माण संस्था, उद्याने, अशा विविध ठिकाणी संविधानाविषयी जनजागृती कारण्याहेतू संविधान पठण हा उपक्रम यशश्वीरित्या राबवला.

मुंबई शहर आणि उपनगरातील अशा ५० पेक्षा अधिक ठिकाणी एकाच दिवशी हा उपक्रम राबवणारे अस्मिता कॉलेज हे एकमेव कॉलेज आहे असे समाजातील काही मान्यवरांचे म्हणणे आहे. या उपक्रमाची सुरुवात अस्मिता कॉलेज ऑफ लॉ चे मुख्याध्यापक डॉक्टर एच. एस. गोरगे यांच्या वेबिनारने झाली, कॉलेजच्या सुमारे ३५० आजी व माजी विद्यार्थ्यांनी या वेबिनार मध्ये आपला सहभाग नोंदविला. डॉक्टर श्री गोरगे यांनी या वेबिनारमध्ये संविधानाची गरज आणि संविधानाची निर्मिती तसेच वेळोवेळी संविधानात झालेले बदल याविषयी सविस्तर माहिती दिली.

savidhan-diwas-at-vikroli

फ्री लीगल एड क्लिनिक चे मुख्य केशव तिवारी यांनी या उपक्रमाची रूपरेषा ठरवून विद्यार्थ्यांना संविधान वाचन यशस्वीपाणे पारपाडण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच फ्री लीगल एड क्लिनिक मार्फत वेळोवेळी जनजागृती साठी असे उपक्रम भविष्यात ही घेण्याची ग्वाही दिली. आपण समाजात वावरत असताना, या समाजा प्रति आपले काही देणे लागते, आणि त्यासाठी असे सामाजिक उपक्रम सतत राबवण्यासाठी सस्मित कॉलेज ऑफ लॉ ची मॅनेजमेण्ट सदैव बांधील राहील अशी खात्री यावेळी, डॉक्टर एच. एस. गोरगे यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here