नाशिक (विशेष प्रतिनिधी इजि.कुबेर जाधव) – गेल्या दोन वर्षा पासून बंद अवस्थेत असलेला वसाका कारखाना सुरू व्हावा म्हणून कामगार संघटना व भाडेकरू संस्था यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे काल व्यवस्थापन मंडळाने परिपत्रकाद्वारे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत काही कर्मचारी आज सकाळी प्रत्यक्ष कामावर हजर झाल्याने सन २०२० – २१ चा वसाकाचा गळीत हंगाम सुरू होण्याच्या कामगाराच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 
वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या कामगार संघटनेने , धाराशिव उद्योग समुहाबरोबर यशस्वी सामंजस्य करार केला , मा कामगार राज्य मंत्री बच्यु कडु यांच्या आदेशाने ,सहा महिन्यां पुर्वि कामगार उपायुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत त्तवरीत करार करने संदर्भात तात्तकाळ कार्यव्हायी करत करार करुन देण्यात त्या कराराची प्रत सहायक आयुक्त शिर्के यांना देण्यात आले ,त्या प्रसंगी धाराशिव कारखान्याचे संचालक आबासाहेब खारे , संतोष कांबळे ,संदीप खारे युनियन चे अध्यक्ष अशोक देवरे कार्याध्यक्ष कुबेर जाधव उपाध्यक्ष वसंत पगार आदी उपस्थित होते
वसाका कारखाना कर्जबाजारी पणामुळे बंद पडला असल्याने युती शासनाच्या काळात आ. डॉ. राहुल आहेर यांच्या प्रयत्नातून डिव्हिपी ग्रुपच्या धाराशिव युनिटला भाड्याने देण्यात आला होता. मात्र मागील थकीत देणे वरून कामगार संघटना व भाडेकरू संस्था यांच्यात वाद निर्माण झाल्याने सदर कारखाना बंद पडला होता. यामुळे कामगाराच्या व कारखान्यावर अवलंबून असलेल्या घटकाच्या चुली बंद पडल्या होत्या.
दरम्यानच्या काळात भाडेकरू संस्था व वसाका यांच्या बाबतीत अनेक वावटळ उठविण्यात आली. मात्र वसाकाची चाके पुन्हा एकदा सुरू व्हावीत कामगारांच्या विझलेल्या चुली पुन्हा सुरू व्हाव्यात यासाठी आ. डॉ. राहुल आहेर, व्यवस्थापकीय मंडळ व कामगार संघटना यांच्यात पुढील करार अबाधित रहावा म्हणून सर्वांचेच प्रयत्न सुरू होते. याबाबत कामगार संघटना नेते व भाडेकरू संस्था यांच्यात आ. डॉ.राहुल आहेर यांच्या उपस्थितीत बैठक होऊन प्रलंबित असलेल्या करारावर चर्चा होऊन अवसायक राजेंद्र देशमुख यांच्या समोर यशस्वी तोडगा काढण्यात आला असल्याने दि ९ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकाला प्रतिसाद देत आज वसाकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुमारे तीनशे कामगारांनी कारखान्यावर आपली हजेरी लावत फॅक्टरी विभागातील काही कामगारांनी प्रत्यक्ष मशीनरीच्या सफाईच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात केली आहे.
आगामी २०२० – २१ च्या दरम्यानचा गळीत हंगाम सुरू होण्याच्या दृष्टीने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दरम्यान भाडेकरू संस्था व कामगार संघटना यांच्यात मागील थकीत देणे बाबत विशेष बोलणे झाले असून याबाबत कामगार नेते मात्र चांगलेच उल्हसित झाले आहेत. वसाका कार्यस्थळावर कालपासून धाराशिव कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, संचालक संदीपान खारे, संतोष कांबळे, आबासाहेब खारे, संजय खरात कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, कार्याध्यक्ष कुबेर जाधव, यांचे सह युनियनचे पदाधिकारी, कामगार व अधिकारी वर्ग याची बऱ्याच दिवसातून वर्दळ दिसून आली.








