पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे ठाणे येथील हॉटेल व्यावसायिक गणेश शेट्टी व कृष्णा सालियान यांना कोरोना योध्दा सन्मान

ठाणे (विशेष प्रतिनिधी) – गेल्या सहा महिन्यापासून ठाणे महाराष्ट्र पोलीस व गृहरक्षक दलातील होमगार्ड कोरोना बंदोबस्त करत आहेत. त्यांना दररोज नाष्ट्याची व्यवस्था ठाणे येथील हॉटेल व्यावसायिकाने केली असून, गेल्या सहा महिन्यापासून नाश्ता व चहाची सोय नियमित मोफत देत आहे त्यांनी कोरोना काळामध्ये गृहरक्षक दलातील जवान, ठाणे व पोलीस दलांना मदत केल्याबद्दल पोलीस बॉईज असोशियन तथा गृहरक्षक दल होमगार्ड संघर्ष समिती सिद्धार्थ डी जाधव, प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत ठाणे येथील हॉटेल व्यवसायिक गणेश शेट्टी व कृष्णा सालियान यांना कोरोना योद्धा सन्मानाने सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here