- जळगांव पोलिस दलातील रावेर वाहतूक पोलिसाची अमानवीय कठोरता
- दोन तास बसविले ताटकळत
- दंडाची पावती न देता पैशाची वसुली
रावेर (शरीफ शेख) – कोरोनाच्या काळात पोलिसांमधील माणुसकीने त्यांचे देवपण अधोरेखित होत असतानाच जळगाव पोलिस दलातील रावेर वाहतूक पोलिसाने मात्र याच्या विपरीत वागून, जळगाव पोलिसांच्या देवपणावर काळीमा फासला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथील एक रुग्ण मध्यप्रदेशातील बुरहानपुर येथील ऑल इज वेल या मल्टीप्लेक्स हॉस्पिटल मध्ये ६ दिवसापासून उपचारांसाठी दाखल असून त्यांचेवर तेथे उपचार सुरू आहेत सर्व कुटुंबीय ताणतणावाच्या परिस्थितीत आहेत मात्र रुग्णालयात रुग्णांची देखभालीसाठी घरातील सदस्य दवाखान्यात हजर आहेत त्यांचे जेवण दैनंदिन मोठा वाघोदा येथून नित्याप्रमाणे रुग्णांचा मुलगा हा पोहोच करण्यासाठी बुरहानपुर येथे जात असताना रावेर पोलिस स्टेशनला कार्यरत धांडे नामक पोलिस कर्मचारी यांनी शे.मुस्तकिम शे चांद यांची मोटारसायकल अडवली मास्क असतांना तोंडाला मास्क नाही .गाडीचे लायसन्स, कागदपत्रे दाखव म्हणत गाडीची किल्ली काढून सहकारी कर्मचारीचे हातात देत ५००/-रपये दंड मागितला. मात्र या आजारी रुग्णांच्या मुलाजवळ एक दमडीही नसल्याने रुग्णाचा मुलगा शे.मुस्तकिम याने रडतरडत हात जोडून सर्व कैफियत सांगूनही माणूसकी हरवलेल्या या धांडे नामक वाहतूक पोलिसाला दयेचा जराही पाझर फुटला नाही उलट वाहतूक पोलिसांना वाहन जप्त करण्याचे काही एक नियम नसतांना मोटारसायकल तर जप्त केलीच पण या रुग्णाचा जेवणाचा डबा पोहचविणाऱ्या मुलासही मोटारसायकल सह ताब्यात घेऊन रावेर पोलिस स्थानकात नेले व २ तास बसवून ठेवले.
मोटारसायकलची किल्ली खिशात घेऊन निघतांना पैसे आण आणि तू आणि तुझी गाडी घेऊन जा असे म्हणत निघून गेले ही सर्व हकिकत शे.मुस्तकिम यांनी एका पत्रकारास सांगितली असता, त्यांनी या वाहतूक पोलिसांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी बोलण्याचे टाळले. एकीकडे जळगांव जिल्हा पोलिस दल कोरोना महामारी संकट काळात अनेकानेक प्रकारचे सहकार्य नागरिकांना सलग ५, ६ महिन्यांपासून जनसेवेच्या रुपातून अविरत आजतागायत पुरवित आहेत यात अन्न वस्त्र निवारासह, प्रवास, पादत्राणे ही पुरवठा करण्यात मागे सरकलेले नाहीत यात सर्व जळगांव जिल्ह्यातील पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्यांत सर्वच दुःखी पिडीतांना खाकी वर्दीतला दर्दी देवमाणूस अनुभवला व अनुभवयास मिळत आहे मात्र आज दि.९/९/२०२० रोजी दुपारी ४ते ६ या दोन तासात रावेर पोलिस स्टेशनला कार्यरत वाहतूक पोलिसाचा उपरोक्त कालावधीतील नियुक्त वाहतूक पोलिसातील अमानवीय वागणुकीचे दर्शन घडले. दिवसरात्र आपले व आपल्या परिवारासह सर्वांचे जिव धोक्यात टाकत अथक परिश्रम घेत जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा करणाऱ्या पोलिस बांधवांची प्रतिमा व निःस्वार्थ जनसेवेसह पोलिस प्रशासनाची प्रतिमा मलिन करीत असणाऱ्या या कठोरह्रदयी वाहतूक पोलिसाच्या कर्तबगारीतून निर्दयीपणाचे दर्शन घडले. उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णाच्या मुलाजवळ फुटकी दमडी नसतांना पोटात अन्नाचा कण नसतांना जिव कासाविस करीत असतांना रडून हात जोडून विनवणी करुनही या निर्दयी वाहतूक पोलिसाला काही एक दया आली नाही अखेर शे.मुस्तकिम ने मोठा वाघोदा येथील मलिक जावेद या आपल्या आजोबा यांना रावेर पोलिस स्थानकात बोलावून दंडाची रक्कम या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला दिली. त्यावेळी या वाहतूक पोलिसाने पैसे घेतले मात्र दंडाची पावती न देता दुसऱ्याच्या पावतीत ॲडजेस्ट केले असे सांगत शे.मुस्तकिम व मोटारसायकल यांना सोडले.
आता या वाहतूक पोलिसाच्या काराभाराला काय म्हणावे? नियम तोडले मान्य आहे परंतु दंड भरुन पावती न देणे हे अमान्य असून नियमबाह्य वर्तन आहे. त्याबरोबरच एखाद्याला दुःखात सहकार्याऐवजी उलट त्रास देणे हे अमानवीय आहे तरी पोलिस प्रशासनाने केलेल्या निःस्वार्थ जनसेवेवर बदनामीचे पाणी फेरणाऱ्या या रावेर पोलिस स्थानकात कार्यरत वाहतूक पोलिसाला माणूसकीच्या दर्शनाचे धडे गिरविण्याचे प्रशिक्षण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी द्यावे, अशी विनंती या त्रस्त आजारी रग्णाचे मुलासह परिसरातील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.







