शहरातील तांबापुरा भागात किरकोळ कारणावरून दगडफेक

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील संमिश्र लोकवस्ती असलेला अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळख असलेल्या तांबापुरा भागात दोन गटात किरकोळ कारणावरून वाद होऊन दगडफेक झाल्याची घटना शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली.
या भागात नेहमी किरकोळ कारणावरून कुरबुरी सुरू असतात शनिवारी या भागात दोन गटात किरकोळ वाद झाला वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते. या घटनेत काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक निलाभ रोहन मोठ्या फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here