शिवसेनेच्या शिरपूर तालुकाप्रमुखपदी बभळाजचे दिपक चोरमले यांची निवड

शिरपूर (प्रतिनिधी) – येथील शिवसैनिक दिपक शिवाजी चोरमले यांची शिरपूर तालुका प्रमुखपदी निवड झाली. तशा आशयाचे पत्र त्यांना पक्षाकडून मिळाले आहे. ते हाडाचे शिवसैनिक असून त्यांनी बभळाज सारख्या ग्रामीण भागातून शिवसेनेच्या संघटनात्मक कार्यास सुरुवात केली.

पक्षाच्या माध्यमाने सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी महत्वाची कामगीरी बजावली आहे. तसेच पक्षाच्या वाढीसाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. पक्षादेशाला प्राधान्य देवून ग्रामपंचायत निवडणुक लढविली. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांकरिता उत्कृष्ट मोर्चेबांधणी केली. पक्षाने जनसामान्यांच्या प्रश्नासाठी काढलेल्या विविध मोर्चे, आंदोलने यात अग्रभागी राहिले आहेत. तसेच धनगर मेंढपाळ समाजाच्या समस्यांसाठीही लढा उभारून युवा मल्हार सेनेच्या माध्यमाने समाजबांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी केली आहे. या कामगिरीची दखल घेवून पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here