पास करण्यासाठी प्राध्यापकाने विद्यार्थींनीकडे केली सेक्सची मागणी

arrest

नवी दिल्ली – छत्तीसगडमधील रायपूर येथे पोस्ट ग्रॅज्युएशनच्या एका विद्यार्थींनीने आंबेडकर रुग्णालयाच्या माजी अधिक्षकावर लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. आरोपी डॉक्टर सध्या राज्यस्तरीय प्रादेशिक कर्करोग संस्थेत संचालक आणि सह-प्राध्यापक आहे. दरम्यान, याप्रकरणी असा आरोप करण्यात आला आहे की, वैद्यकीय परीक्षेत ग्रेड देण्यासाठी डॉक्टर प्राध्यापकाने विद्यार्थ्यांनीकडे सेक्सची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.
विद्यार्थिनीसह तिच्या सासरच्यांनी आणि एका सह विद्यार्थींनीने राज्य महिला आयोगाकडून आरोपी डॉक्टरविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. असा आरोप केला जात आहे की, जेव्हा विद्यार्थीनीने डॉक्टरची मागणी पूर्ण केल्या नाहीत तेव्हा त्याने दुसर्‍या वर्षाच्या अंतिम परीक्षेत विद्यार्थिनीला चक्क नापास केलं.
दरम्यान, आयोगाच्या प्रमुख किरणमयी नायक यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, तक्रारदार तरुणीने डॉक्टरने तिला पाठविलेल्या कथित अश्लील मेसेजचे स्क्रीनशॉट देखील तक्रारीत जोडले आहेत. आयोगाने डॉक्टरला सुनावणीसाठी २३ सप्टेंबरला बोलावले आहे.
दरम्यान, आरोपी डॉक्टरने मात्र आपल्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावत ते निराधार असल्याचं म्हटलं आहे. यावेळी डॉक्टरने म्हटलं आहे की, ‘एका अपात्र विद्यार्थीनीला डॉक्टर बनण्यापासून आणि समाजाला हानी करण्याची परवानगी देऊ शकत नाही.’ आरोपी डॉक्टरचं म्हणणं आहे की, ‘दुर्दैवाने एका पदव्युत्तर विद्यार्थीनीने हे आरोप लावले आहेत, जी मागील वर्षी वैद्यकीय परीक्षेत नापास झाली होती. तक्रारदाराचे म्हणणे आहे की, मी जाणीवपूर्वक तिला नापास केले. पण तिचे हे आरोप निराधार आहेत.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here