अब्जाधीश असूनही मंदिराच्या स्वयंपाकघरात भाज्या चिरताहेत, व्हायरल झाला फोटो

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – आपली साधी राहणी आणि उच्च विचारसरणीमुळे सर्वांमध्ये लोकप्रिय असलेल्या सुधा मूर्ती यांना कोण ओळखत नाही? सुधा मूर्ती अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांनी समाजासमोर आपला मोठा आदर्श ठेवला आहे. आपल्या कामाने त्यांनी मानाची एक नवी उंची गाठली आहे. श्रीमंत असूनही त्यांची साधी राहणी यामुळेच त्यांचा आपलेपणा वाढवते. सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोची लोक तोंडभरून स्तुती करत आहेत. या फोटोत सुधा मूर्ती एका मंदिराच्या स्वयंपाकघरात बसून भाज्या चिरताना दिसत आहेत.
सुधा मूर्ती आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची पत्नी आहे. मात्र त्यांची ओळख केवळ नारायण मूर्ती यांची पत्नी इतकीच मर्यादित नाही. तर त्यांनी आपली वेगळी ओळख बनवली आहे. इन्फोसिस कंपनी उभारण्यात जितके योगजान नारायण मूर्ती यांचे आहे तितकेच योगदान सुधा मूर्तींचेही आहे. सुधा या प्रसिद्ध लेखिकाही आहेत. त्यांनी आतापर्यंत ९०हून अधिक भाषांमध्ये पुस्तके लिहिली आहेत.
सोशल मीडियावर सुधा मूर्तींचा जो फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये असे लिहिले आहे की, फोटोत दिसत असलेल्या महिला या सुधा मूर्ती असून ज्या नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. तसेच इन्फोसिसच्या सहसंस्थापक आहेत. अब्जाधीश असूनही या भाजी चिरत आहेत. असं सांगतात की वर्षातील एक दिवस त्या तिरुमाला बालाजी मंदिरात जातात आणि तीन दिवस जनसागर स्थित राघवेंद्र स्वामी मठात भाज्या कापतात. दरवर्षी त्या हे काम करतात ज्यामुळे येणाऱ्या पैशामुळे कोणत्याही प्रकारचा अहंकार निर्माण होऊ नये. सुधा मूर्ती गेली अनेक वर्षे समजापयोगी कामे करत आहेत. त्यांनी तीन हजार सेक्स वर्कर्सच्या पुनर्वसनासाठी १८ वर्षे घालवली. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना बुलंद पोलिस टाइम्स्‌चा सॅल्यूट.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here