मॉस्को – एक १४ वर्षीय मुलगी ही आई बनली आहे. मुलगी १३ वर्षांची असतानाच गर्भवती राहिली होती. या मुलीचे नाव डारिया असून आहे ज्या मुलापासून ती गरोदर राहिली आहे त्याचे नाव इव्हान असे आहे. ज्याचे वय फक्त ११ वर्ष एवढेच आहे. डारियाने स्वत: गरोदरपणाची बातमी दिली आहे. दोन्ही अल्पवयीन मुलं हे रशियातच राहणारे आहेत.
डारियाच्या गरोदरपणाची बातमी याच वर्षी जानेवारीत प्रथमच आली. तेव्हा जगभरातील मीडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. आता ही मुलगी आई झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. १४ वर्षांची डारिया म्हणते की, रशियन परंपरेनुसार ती 40 दिवसांपर्यंत आपल्या मुलाचा चेहरा कोणालाही दाखवणार नाही. पण डारियाने याबाबतची माहिती मात्र सोशल मीडियावर दिली आहे. सोशल मीडियावर तिचे फॉलोवर्स देखील तब्बल ४ लाख एवढे आहेत.
तिने तिचा प्रसूती अनुभव तिच्या फॉलोवससाठी शेअर केला. ज्यात ती म्हणते… ‘मी माझी देहभान विसरत होते त्याचवेळी त्यांनी माझ्या पोटावर एका बाळाला ठेवले आणि नंतर मी पुन्हा बेशुद्ध झाले. मला वाटलं नव्हतं की, मुलाला जन्म देण्याचा अनुभव असा असेल. मला वाटलं होतं की हे खूप वेदनादायक असेल. परंतु जर आपण आनंदासाठी थोडासा त्रास सहन केला तर आपल्याला त्या वेदना काहीच वाटणार नाहीत.’
काही महिन्यांपूर्वी एक अशी बातमी समोर आली होती की, एक १३ वर्षाची मुलगी ही १० वर्षाच्या मुलाकडून प्रेग्नंट झाली आहे. त्यावेळी या दोघांनी एका न्यूज चॅनलला मुलाखत देखील दिली होती आणि जन्माला येणारं बाळ हे आपलचं असल्याचा दावा केला होता. मात्र, अनेक डॉक्टरांना याबाबत शंका वाटत होती. कारण की, त्यांच्या मते, १० वर्षाच्या मुलाच्या शरीरात शुक्राणूंची निर्मितीच होत नाही. मात्र, मुलीने डॉक्टरांचा देखील दावा फेटाळून लावला होता.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी एक नवीन खुलासा केला होता. या प्रकरणात एका १५ वर्षाच्या मुलाला ‘हाउस अरेस्ट’ करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, हा १५ वर्षाचा मुलाकडूनच १३ वर्षाची मुलगी गरोदर राहिली असल्याचा पोलिसांना संशय होता.
दरम्यान, ती १३ वर्षाची मुलगी आधी दावा करत होती की, १० वर्षाचा मुलगा हाच तिचा बॉयफ्रेंड असून आपण त्याच्यापासूनच प्रेग्नंट आहोत. तिनेच स्वतः पोलिसांना असा जबाब दिला होता की, १५ वर्षांच्या मुलासोबत आपले शारीरिक संबंध होते. दरम्यान, पोलिसांनी मुलाची ओळख जाहीर केलेली नाही. परंतु रशियातील सायबेरियाच्या घरात तो नजरकैदेत आहे. रशियामध्ये सहमतीने सेक्स करण्यासाठी १६ वर्षाची मर्यादा आहे.
दरम्यान, १४ वर्षीय मुलीचं अद्यापही असंच म्हणणं आहे की, नवजात बालकाचा बाप हा ११ वर्षीय तिचा बॉयफ्रेंडच आहे. दरम्यान, याची शहनिशा करण्यासाठी रशियन पोलिसांनी नवजात बालक आणि त्याच्या आई-बापाचे डीएन सॅम्पल देखील घेतले आहेत.







