मराठा आरक्षणावरुन बाबाराजे देशमुख सरकारवर कडाडले

सातारा (प्रतिनिधी सत्यजीत माने) – महाराष्ट्राचा ढाण्या वाघ म्हणून प्रसिध्द असलेले बाबाराजे देशमुख यांनी मराठा आरक्षण या विषयावर पत्रकार परिषद बोलावली होती.
या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, अटकेपार झेंडे फडकावणाऱ्या मराठ्यांचे आम्ही वंशज असून, मराठा आरक्षणासाठी देत असलेल्या लढ्यात आम्ही माघार घेणार नाही. आमच्या मागण्या ठाम मांडण्यासोबत आम्ही गरज पडली तर मंत्रिमंडळातील मराठा मंत्र्यांनी घेराव घालू. मराठा मोर्चातील काही माणसांना पैसे देऊन फोडले तरी आमच्या आंदोलनाची धार कमी होणार नसून, आम्ही कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाहीत. मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here