चोपडा (प्रतिनिधी मिलिंद वाणी) – सेवा सप्ताह निमित्त व देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी साहेबांच्या 70व्या वाढदिवसाच्या निमित्त चोपडा तालुका भारतीय जनता पाटीॅ कडून आज पक्ष कार्यालयात पदाधिकार्यांनी मोदीजीच्या कार्याचा गौरव केला व मनोगत व्यक्त केले. तसेच कोरोनामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तिचे अंतीम संस्कार करणार्या योध्द्यांचा सत्कार भारतीय जनता पाटीॅच्या पदाधिकार्यांच्या हस्ते करण्यात आला,
चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप पदाधिकांर्याच्या हस्ते करण्यात आले, चोपडा कोविड सेंटर मधील रुग्णांना मास्क,व फळ ,बिस्कीट पाकीट वाटप करण्यात आले, तसेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम पदाधिकार्यांच्या हस्ते करण्यात आले..
याप्रसंगी उ.महा.ओबीसी सेल अध्यक्ष प्रदिप पाटील, तालुकाध्यक्ष पंकज पाटील,जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे,चोपडा पं.स.उपसभापती भूषण भिल,जिल्हा चिटणीस राकेश पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,मा.शहराध्यक्ष राजूभाऊ शर्मा,मनिषभाई गुजराती,बाजार समिती संचालक धनंजय पाटील,तापी सुतगिरणी संचालिका सौ.रंजनाताई नेवे,डाॅ.भारतीताई क्षिरसागर,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील,जिल्हा संवाद संयोजक भरत सोनगिरे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,पंकज पाटील,डाॅ.विक्की सनेर,सरचिटणिस सुनिल सोनगिरे,परेश धनगर,पिंटू पावरा,अल्पसंख्यांक आघाडीचे संजय श्रावगी,मगन महाजन,विठ्ठल पाटील,संभाजी पाटील,रावसाहेब पाटील सरपंच आडगाव,वर्डी-विवेक गुर्जर,विकास पाटील,बारकू पाटील,योगराज पाटील,भरत पाटील,लक्ष्मण पाटील,विजय बाविस्कर,भाईदास कोळी,प्रणय टाटीया,अक्षय,सोशल मिडीया संयोजक मिलिंद वाणी,कार्यालय मंत्री मोहित भावे,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.








