पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर येथे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते ब्लँकेट वाटप

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – भारताचे प्रभावशाली पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगर येथे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते गरीब आदिवासींना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम झाला. यानंतर परिसरात वृक्षारोपण करुन, छोटेखानी पध्दतीने पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी जे.डी.सी.सी. बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर, कृ.उ.बा. सभापती निवृत्ती पाटील, भाजप तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, माजी सभापती विलास धायडे, सरचिटणीस चंद्रकांत भोलाने, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, माजी सरपंच प्रविणपाटील,नगरसेवक निलेश शिरसाट, डॉ प्रदीप पाटील, बापू ससाणे, अनिल पाटील,दिपक साळुंखे,निलेश मालवेकर, शिवराज पाटील,भैय्या पाटील, गौरव बाभुलकर व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here