जळगांव (संपादक सुनिल पाटील) – आज (दि.१७) भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस जळगांव तालुका काँग्रेसतर्फे बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे ड्रीग्री सर्टीफिकेट जाळून निषेध नोंद नोंदवण्यात आला यावेळी तालुका अध्यक्ष – मनोज चौधरी ,प्रमोद घुगे ,धनराज जाधव, भिकण सोनवणे, निशा फेगडे, भाऊसाहेब सोनवणे ,सचिन माळी , गौरव माळी, पी.टी.पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पत्रकारांना जळगाव (ग्रामीण) तालुका काँग्रेसतर्फे निवेदन देण्यात आले. यात २०१४ मध्ये भारतातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन नव्हे तर आमिष दाखवून निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे पदवी प्रमाणपत्रांची होळी करुन आम्ही त्यांचा निषेध करीत आहोत.
या निवेदनावर जळगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी, प्रमोद घुगे, भाऊसाहेब सोनवणे, भिकन सोनवणे, धनराज जाधव, महिला अध्यक्षा निशा फेगडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.









