चोपडा येथे शासकीय महाविद्यालय सुरु करण्याची आमदार लताताई सोनवणे यांनी केली मागणी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना भेटून केली निवेदनाद्वारे मागणी

चोपडा (संदिप ओली) – दि. १८/९/२०२० रोजी महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत जळगाव जिल्ह्यात आले असता चोपडा तालुक्यात एक नवीन कला,वाणिज्य,विज्ञान व कृषी वरिष्ठ शासकीय महाविद्यालय सुरु करणेबाबत तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व अकृषी विद्यापीठात शारिरीक शिक्षण संचालक,शारिरीक शिक्षण उपसंचालक आणि शारिरीक शिक्षण सहाय्यक संचालक ही
यु.जी.सी. मान्यता प्राप्त पदे भरणेबाबत ची मागणी करून त्याबाबत लेखी निवेदन दिले.या दोन्ही मागणीबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत यांनी दिले. यावेळी मंत्री महोदयांचा सत्कार आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केला.याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व उपजिल्हाप्रमुख मुन्ना पाटील हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here