कोल्हापूर येथील गृहरक्षक दलाच्या जवानांसाठी धावून आले पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख

एक हृदयविकाराने मयत पावलेल्या व एका जखमी होमगार्डच्या मदतीसाठी पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना एक दिवसाचे वेतन देण्याचे केले आवाहन

कोल्हापूरचे-होमगार्ड-हृदयविकाराने-मरण-पावलेले-सुनील-काटे

मुंबई (विशेष प्रतिनिधी सिद्धार्थ जाधव) – आजच्या कोरोना महामारीमध्ये महाराष्ट्र पोलीस व गृहरक्षक दलातील होमगार्ड हे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी 24 तास डोळ्यात तेल घालून समाजातील लोकांचे रक्षण करत आहे हे करत असताना अनेक पोलिस व होमगार्ड कोरोनाबाधित झाले आहेत. ठाणे जिल्ह्यातील पालघर येथील होमगार्ड जवानाचासुध्दा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांना सुद्धा 50 लाख रुपयांचा विमा मिळाला नाही त्यात उल्हासनगर येथील महिला अपघातात जखमी होऊन गंभीर जखमी झालेली आहे तिला सुद्धा मदतीची आवश्यकता आहे.
असे असताना कोल्हापूर येथील पोलीस अधीक्ष डॉ. अभिनव देशमुख यांनी शुक्रवारी (दि 18) बिनतारी संदेश पाठवलेला आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील एका होमगार्डचे हृदयविकाराने निधन झाले आहे व एक होमगार्ड अपघातात जखमी झाले आहेत. या दोघांच्या मदतीसाठी कोल्हापूर येथील पोलीस अधीक्षकांनी आदेश पारित केले आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी एक दिवसाचे वेतन हे सदर होमगार्डला द्यावे. असे इतिहासात प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यात घडले आहे. होमगार्डच्या मदतीसाठी पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्ष डॉ. अभिनव देशमुख यांना गृहरक्षक दल होमगार्ड संघर्ष समितीकडून मानाचा मुजरा तसेच होमगार्ड संघर्ष समितीकडून सुद्धा प्रत्येकी दोन दोन हजार रुपये कोल्हापूर जिल्ह्यातील होमगार्डांना दिले जातील.
सर्व पोलीस बॉईज असोसिएशन व गृहरक्षक दल होमगार्ड संघर्ष समितीच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे की ज्यांना शक्य होईल त्यांनी कोल्हापूर येथील पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना संपर्क साधून मदत करावी. कारण पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे होमगार्ड जवान असून, त्यांना मदत करणे हे आपले सर्वांचे प्रथम कर्तव्य आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here