अबुजा – बलात्कारातील दोषींना शस्त्रक्रियेद्वारे नपुंसक करण्याची शिक्षा देण्याचा निर्णय नायजेरियातील कदुना प्रांतातील सरकारने घेतला आहे. पीडिता १४ वर्षांखालील असेल तर दोषीला फाशी देण्यात येणार आहे.
नायजेरियात बलात्काराच्या घटना वाढत असल्यामुळे लोकांमध्ये संताप होता. कदुना प्रांतात त्यामुळे राज्यपालांना आणीबाणी जाहीर करावी लागली. राज्यपाल नसीर अहमद इल रुफई यांनी सांगितले की, गुन्हेगारांपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी कडक पावले उचलण्याची आवश्यकता होती. ती आम्ही उचलली.
महिलेने १४ वर्षांखालील मुलावर बलात्कार केल्यास महिलेचे गर्भाशय काढून टाकण्यात येणार आहे. १४ वर्षांवरील मुलीवर बलात्कार करणार्या आरोपीला जन्मठेप भोगावी लागेल.







