ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर असोसिएशनतर्फे छायाचित्रकारांना प्रमाणपत्र वाटप

चोपडा (तालुका प्रतिनिधी संदीप ओली) – प्रधानमंत्री कौशल विकास योजना अंतर्गत कौशल्य भारत कुशल भारत अंतर्गत ऑल महाराष्ट्र फोटोग्राफर असोसिएशन तर्फे चोपडा तालुक्यातील नोंदणीकृत सदस्यापैकी प्राथमिक स्वरूपात चाळीस सदस्यांना शासकीय प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
त्यात शुभम वासुदेव माळी, नीलेश पालीवाल ,अल्केश महाजन ,ज्ञानेश्वर सोनगिरे , मुरली पाटील ,गोपाळ कोळी ,भुषण पाटील , सुनील महाजन इत्यादी छायाचित्रकारांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . त्यावेळी असोसिएशनचे तालुकाप्रमुख नानाभाऊ सैंदाणे , शहर प्रमुख विलास कोष्टी , प्रसिद्धीप्रमुख प्रशांत चौधरी ,छोटू किरमाणी इत्यादी कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here