शिरपूर तालुक्यातील असंख्य तरुणांचा मनसेत प्रवेश

शिरपुर (प्रतिनिधी प्रशांत वाकडे(वरुळ)) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे व अमित ठाकरे यांच्या आदेशाने, मनविसे प्रदेशाध्यक्ष आदित्य शिरोडकर, उत्तर महाराष्ट्र प्रभारी मनोज रामराजे, प्रदेश उपाध्यक्ष संदीपजी भवर, धुळे संपर्क अध्यक्ष गणेश दादा बुरकुल, धुळे मनविसे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रसाद सतिष देशमुख, जिल्हासचिव.गौरव गिते, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष पुनमचंद मोरे यांच्या मार्गदर्शनाने आज दि. २३ सप्टेंबर रोजी शिरपूर तालुक्यातील येथील असंख्य तरुणांनी मनसे विद्यार्थी सेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सर्व प्रवेश करणाऱ्या तरुणांचे स्वागत करून मनसे चा झेंडा खांद्यावर देत अन्यायाविरोधात लढून जनतेला, विद्यार्थ्यांना महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत रहावा, राजसाहेब व पक्षाचे विचार घराघरात पोहचवावे असे प्रतिपादन करून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे मनविसे धुळे जिल्हा अध्यक्ष प्रसाद देशमुख मनसे धुळे जिल्हा उपाध्यक्ष राकेश चौधरी मनविसे धुळे शहराध्यक्ष. हर्षल परदेशी, जिल्हाउपाध्यक्ष पुनमचंद मोरे, तालुकाअध्यक्ष चेतन पाटील, मनविसे शिरपूर शहर अध्यक्ष सोनु राजपुत,मनविसे ता.संघटक कैलास बाबर,रमेश भिल,आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here