गृहरक्षक दलातील जवान संदेश विटनोर यांचा प्रवरा पात्रात बुडून मृत्यू

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) – अकोले-होमगार्ड असणाऱ्या संदेश विटनोर या युवकाचा प्रवरा नदी पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हाच खरा कोरोना योद्धा असल्याची अकोलेकरांची भावना झाली असून, या युवकाच्या अकाली मृत्यूने राहुरी तालुक्यातील मांजरी गावात शोककळा पसरली आहे.
अकोले तालुक्यातील राहुरी तालुक्यातील मांजरी या गावचा संदेश विटनोर या युवकाचा अकोले तालुक्यात आपले कर्तव्य बजावत असताना मुक्कामी अकोले तालुयक्यातील अगस्ती मंदिर प्रसाशनाने सोय केलेली होती.माञ सकाळी आघोंळी साठी बाहेर पडलेल्या युवकाचा प्रवरा नदीच्या पाञात बुडून मृत्यू झाला.या बातमीने अकोले तालुक्यात व परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
एकीकडे अकोले तालुक्यात व महाराष्ट्रात कोरोना कालावधीत आपले कर्तव्य तुटपुंज्या मानधनात काम करत असताना अशी घटना ही अतिशय क्लेशकारक असल्याच अकोलेकरांनी व्यक्त केली आहे. कोरोना कालावधी आपला जीव जोखिमीत टाकुन इतरांची सुरक्षा केली त्या युवकाचा जीव धोक्यात आल्याची भावना आज अकोले तालुक्यात निर्माण झाली आहे यामुळे आशा सेविका,अंगणवाडी सेविका,होमगार्ड, पोलिस, वैद्यकिय कर्मचारी यांना सुरक्षा देणे काळाची गरज आहे.माञ ही सर्व गोष्ट घडली असताना एकीकडे कोरोना योध्दा म्हणुन कर्मचार्यांना गौरवीत असताना नुसते पुरस्कार, सन्मान नको तर सुरक्षेची गरज असल्याच निदर्शनास येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here