कळवण तालुका प्रहार जनशक्ती संघटनेच्या उपतालुकाध्यक्षपदी इम्रान शहा यांची निवड

कळवण (तालुका प्रतिनिधी महेश कुवर) – कळवण तालुका प्रहार जनशक्ती संघटनेच्या उपतालुकाध्यक्ष पदी सप्तश्रृंग गड येथील सामाजिक कार्यकर्ते इम्रान शहा यांची नुकतीच निवड करण्यात आली.
नुकत्याच घेण्यात आलेल्या जिल्हा समितीच्या बैठकीत कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गड येथील रहिवाशी असलेले सामाजिक कार्यकर्ते इम्रान शहा यांची प्रहार जनशक्ती संघटनेच्या उपतालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.असल्याची माहिती जिल्हाप्रमुख अनिल भंडागे,यांनी दिली.तसेच यावेळी प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाप्रमुख अनिल भंडागे.उपजिल्हाप्रमुख सागर निखाळे,व इतर पदाधिकारी मान्यवरांच्या हस्ते इम्रान शहा यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
इम्रान शहा यांनी आपले मनोगत व्यक्त करतेवेळी सांगितले की,प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ बच्चु कडु.यांनी जो विश्वास दाखवून जिल्हाप्रमुख अनिल भंडागे उपजिल्हाप्रमुख सागर निखाळे,यांनी माझ्यावर जी जबाबदारी व जो विश्वास दाखविला त्यांच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही.तसेच दिव्यांग लाभार्थी व शेतकऱ्यांच्या समस्या व अन्याय अत्याचाराविरुध्द प्रखरपणे तालुक्यात काम करणार आसल्याचे इम्रान शहा यांनी आपल्या मनोगतीय भाषणात सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here