चोपडा (तालुका प्रतिनिधी संदीप ओली) – आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नातून चोपडा उपजिल्हा रुग्णालयात ८ आय. सी.यु. बेडचे लोकार्पण सोहळा चोपड्याचे आमदार लताताई सोनवणे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे होते.
यावेळी आमदार लताताई सोनवणे यांनी बोलतांना सांगितले की या आय. सी.यु. बेडमुळे चोपडा मतदारसंघातील गंभिर रुग्णांना आवश्यकसेवा तात्काळ मिळणार असून खाजगी दवाखान्यात न परवडणारा खर्च आवाक्यात येणार आहे.यासोबत रुग्णांच्या जिवीताशी होणारा खेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
या कार्यक्रमाप्रसंगी गटविकास अधिकारी बी. एस.कोसोदे,उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ.मनोज पाटील, डॉ.पंकज पाटील,डॉ.गुरुप्रसाद वाघ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप लासुरकर,तसेच यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मुन्ना पाटील,जि. प. सदस्य हरीश पाटील,शहर प्रमुख आबा देशमुख,नरेश महाजन,न.पा.गटनेते भैय्या पवार,मा.पं.स.उपसभापती एम.व्ही.पाटील,जि.प.सदस्य भरत बाविस्कर,अॕड.एस.डी. सोनवणे,नगरसेवक प्रकाश राजपूत,राजाराम पाटील,किशोर चौधरी,महेंद्र धनगर,सौ.मिनाताई शिरसाट,संध्या महाजन,युवासेना उपजिल्हाप्रमुख दीपक चौधरी, युवासेना तालुकाप्रमुख गोपाळ चौधरी,सुनील पाटील,गणेश पाटील,प्रताप पावरा,अॕड. शिवराज पाटील,वासुदेव महाजन सुनिल बरडीया,राजेंद्र जैस्वाल, वासुदेव महाजन,नंदू गवळी, सुनील पाटील आदी शिवसैनिक उपस्थित मोठ्या संख्येने होते.








