नाशिक (जिल्हा प्रतिनिधी सतीष पाटील) – विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आली आहे. त्यांच्या विधानभवन कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. अधिकारी, कर्मचारी यांना क्वारंटाईन करून त्यांची तपासणी करण्यात आली होती. मात्र, आता झिरवळ यांनाही कोरोनाने गाठले आहे.
स्वतः नरहरी झिरवाळ यांनी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. त्यांना नाशिक येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असली तरी तब्येत चांगली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन झिरवाळ यांनी केले आहे.







