धुळे (प्रतिनिधी) – शिवसेना हा वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांने व पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने चालणारा पक्ष आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाची शिस्त पाळूनच काम करायचे असून शिवसेनेत राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा इशारा शिवसेनेचे धुळे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी दिला आहे. श्री. थोरात धुळे जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांची सर्कीट हाऊस, साक्री रोड येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
पक्षशिस्तीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, पूर्वी या जिल्ह्यातून शिवसेनेचे दोन आमदार निवडून आले होते. शिंदखेडा विधानसभा मतदार संघातून देखील शिवसेनेचाच आमदार निवडून आला होता. त्यानंतर मात्र पक्षात कुठेतरी पोकळी निर्माण झाली. अंतर्गत वाद वाढत गेले. यामुळे पक्षाची ताकद कमी होत गेली. याचाच फायदा विरोधकांनी घेतला. परंतु यापुढे हे सहन केले जाणार नसून प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षाची शिस्त ही पाळावीच लागेल. काही दिवसापूर्वी पक्षात नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांच्यावर शिवसेना वाढविण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. इतरांनी मतभेद विसरुन त्यांना सहकार्य करावे. येणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा अश प्रत्येक निवडणूकीत शिवसेनेचा झेंडा फडकावयाचा असून जिल्ह्यात लवकरच शिवसेनेचे सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातून 1 लाख सदस्य जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे ही श्री.थोरात यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, तुळशीराम गावीत यांच्यासह शिंदखेडा तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यांनी केला पक्षप्रवेश
यावेळी संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या उपस्थितीत शिंदखेड्याचे प्रा. अनिल माळी, योगेश माळी, विशाल परदेशी तर दोंडाईचा शहरातून ॲड. जतीन वाघेला, चुडामण बोरसे, दिपक मराठे, कुंदन सोनवणे, निखिल जयसिंघानी, विशाल (सोनु) कोळी, दिनेश मराठे, नरेद्र धात्रक, प्रदीप पवार यांनी हातावर शिवबंधन बांधून पक्षप्रवेश केला
Home उत्तर महाराष्ट्र धुळे शिवसेनेत राहून पक्षविरोधी काम करणाऱ्यांची गय केली जाणार नाही : संपर्कप्रमुख बबनराव...







