ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – एकीकडे कोरोनाच्या धास्तीने सर्वत्र लाॅकडाऊन सुरु असताना अनेकजण इतर आजारानेही ग्रासले आहेत. अशातच जालना घनसांवगी येथील होमगार्ड सैनिक राजू पवार यांच्या तीन वर्षाचे मूलाला ब्लड कॅन्सर आहे त्याचे ऊपचारा करीता, कदीम जालन्याचे होमगार्ड, पोलीस कर्मचारी व पोलीस निरीक्षक श्री.महाजनयांनी आर्थिक मदत केली.
दवाखान्याचा संपूर्ण खर्च करणे अशक्य असलेल्या राजू पवार यांना पोलिसांच्या या मदतीने अश्रु अनावर झाले. संबंधित रकमेचा धनादेश त्यांच्याकडे देण्यात आला. जालना पोलीस स्टेशन चे कर्मचारी, अधिकारी व होमगार्ड यांनी होमगार्ड राजू पवार यांना मदत केल्याबद्दल गृहरक्षक दल होमगार्ड संघर्ष समिती कडून मानाचा मुजरा. जालना पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी या होमगार्डच्या मागे उभे राहील याबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून जालना पोलीस निरीक्षक श्री.महाजन यांचे कौतुक होत आहे.







