कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – युवा पत्रकार संघाच्या वतीने शहरात ७५ वे महास्वचछता अभियान उत्साहात कोल्हापूर महानगरपालिका, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, स्वरा फाऊंडेशन सहकार्यने संपन्न झाला उपक्रम.
लेखणीच्या फटकऱ्याने समाजातील कचरा साफ करणाऱ्या पत्रकार बांधवांनी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर हातात प्रत्यक्ष झाडू घेऊन कोल्हापूर शहराच्या स्वच्छता मोहिमेत नोंदवलेला सहभाग कौतुकास्पद आहे , असे प्रतिपादन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.
युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने रविवार ४ ऑक्टोंबर रोजी ताराराणी चौक ते दसरा चौक परिसरात ७५ वे महास्वचछता अभियान राबविण्यात आले. कोल्हापूर महानगपालिकेचे आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक मधुकर चौगले यांनी स्वतः रस्त्यावर उतरून या महास्वचछता अभियानात हाती झाडू घेऊन आपला सक्रिय सहभाग नोंदवला.
कोल्हापूर महानरपालिकेच्या आरोग्य विभागाचे निरीक्षक करण लाटवडे, मुकादम महेश माने यांच्या नेतृत्वखालील आरोग्य विभागाच्या सफाई कर्मचाऱ्यांनी तसेच स्वरा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद माजगावकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस कर्मचऱ्यांनी या सफाई अभियानात आपला सक्रिय सहभाग घेऊन ताराराणी चौकातून सकाळी ७ वाजता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते या ७५ व्या महास्वचछता अभियानाचा शुभारंभ झाला उपमहापौर संजय मोहिते, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे उपनिरीक्षक श्री मधुकर चौगुले, स्वरा फाऊंडेशनचे संस्थापक प्रमोद माजगावकर, युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे, राज्य उपाध्यक्ष सुशांत पवार संघाचे जिल्हाध्यक्ष जावेद देवडी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नवाब शेख, प्रदेश उपाध्यक्ष राकेश पोलादे, सांगली जिल्हा अध्यक्ष संतोष कुरणे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष निलेश जाधव, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. 
ताराराणी चौक, परिसर हॉटेल पंचशील चौक ते राजीव गांधी पुतळा परिसर, दाभोळकर कॉर्नर, शाहूपुरी पोलिस ठाणे परिसर, गोकुळ हॉटेल परिसर, व्हिनस कॉर्नर चौक परिसर ते दसरा चौक परिसरात सकाळी सात ते नऊ या वेळेत युवा पत्रकार संघाच्या सभासद पत्रकार बांधवांनी या सफाई मोहिमेत आपला सहभाग नोंदवला. महिला पत्रकार भगिनींनी या मोहिमेत नोंदवीलेला सक्रिय सहभाग या मोहिमेचे वैशिष्ट्य ठरले.दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते या उपक्रमाचा सांगता झाली.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या पुढाकाराने आतापर्यंत 74 महा स्वच्छता मोहिमा झाल्या पण 75 वी युवा पत्रकार संघाची स्वच्छता मोहीम सर्वात लक्षवेधी आणि परिणामकारक झाल्याचे गौरवोद्गार आयुक्त डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी यांनी या मोहिमेचा समारोप प्रसंगी बोलताना काढले चिमुकल्या स्नेहाचा ही मोहिमेत उस्पूर्त सहभाग या माहा स्वच्छता मोहिमेत युवा पत्रकार संघाच्या सभासद पत्रकारांसह चिमुकल्या स्नेहा शिवाजी शिंगे हिने नोंदवलेला सहभाग कौतुकास्पद ठरला स्नेहा चे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कौतुक केले
या मोहिमेत युवा पत्रकार संघाच्या महिला जिल्हाध्यक्ष सो सुलोचना नार्वेकर, कु. गायत्री माजगावकर, महिला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सौ. अर्चना चव्हाण, बाबुराव वळीवडे, शरद गाडे, भुदरगडतालुकाध्यक्ष समीर मकानदार, रत्नदीप चव्हाण, मुबारक अत्तार, करवीर तालुका अध्यक्ष संदीप शिंदे, मुरलीधर भोसले, राजू चौगुले, प्रदीप पवार, नितीन ढाले, योगेश दंडवते, पांडुरंग डवर, संभाजी पाटील, अर्जुन दिंडे, अभिजीत भोसले, अजय शिंगे, रोहित वज्रमठ्टी, नियाज जमादार, डी. एस. कोंडेकर, रत्नदीप चव्हाण, मंगेश करंबळे, संतोष पवार, आकाश चव्हाण, , अतुल पाटील, रवींद्र पाटील, मनपा आरोग्य विभागाचे कर्मचारी रोमियो गर्दे, सौ गीता भंडारे, मनीषा हेगडे, सविता साठे, मीना देवकुळे, गीता शिंदे, शकुंतला कांबळे, महावीर कोठावळे, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे दिलीप नागोरे, विजय पाटील, प्रसाद कारेकर, रणजीत साळवी, शिवाजी सूर्यवंशी, स्वरा फाऊंडेशनचे पियुष हूल्लस्वार, उमेश कांबळे, धर्मराज पडळकर, अजिंक्य पाटील, यांनी सहभाग नोंदविला







