धरणगांव (उपसंपादक प्रा.पी एम पाटील) – जळगाव येथील विश्रामगृहात शिवसेनेच्या पदाधिकार्यांची महत्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली.
जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजयजी सावंत यांनी मार्गदर्शन करताना पदाधिकाऱ्यांना सांगितले महाराष्ट्रात आता आपले शासन असून लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांची कामे करा नागरिक ग्रामस्य आपल्या कडे समस्या घेऊन येतील त्या पेक्षा आपण त्यांच्या कडे जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना मदत करा पक्षाच्या प्रोटोकॉल प्रमाणे प्रत्येक तालुका प्रमुखाने,लोकप्रतिनिधी,जिल्हा प्रमुख,उपजिल्हा प्रमुख,तालुका प्रमुख यांच्याशी संपर्क साधून कामे करण्याचे आदेश दिलेत.
जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले,उपजिल्हा प्रमुख,तालुका प्रमुख,शहर प्रमुख यांनी तालुक्याचे दौरा करून कोविड सारख्या विषाणू बाबत जनजागृती करून जनतेला धीर द्या,त्यांच्या सुखा-दु:खात कामाला या.
संपर्क प्रमुख संजयजी सावंत साो यांच्या उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर यांनी सत्कार केला या प्रसंगी सौ.महानंदा पाटिल,महानगर प्रमुख शरदभाऊ तायडे,शिवराज पाटील,समाधान पाटील व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.







