मुंबई- पुणे जाणाऱ्यांसाठी खुशखबर! तब्बल २० रेल्वेगाड्या होणार सुरु

sewagram-express

मुंबई (हितेश मिस्त्री) – कोरोना आणि लॉकडाउनमुळे सहा महिन्यांपासून बंद असलेली रेल्वेसेवा थोड्याफार प्रमाणात रुळावर येत आहे. अनलॉक पाचमध्ये राज्यांतर्गत प्रवासी रेल्वेसेवा सुरू करण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार रेल्वेखात्याने दसरा-दिवाळी सणासाठी येत्या 20 ऑक्‍टोबरपासून रेल्वे सुरू करण्याचे नियोजन केलेले आहे. 15 ऑक्‍टोबरपासून आरक्षण सुविधा उपलब्ध होणार आहे.

 

अमरावती- सीएसटी ( अंबा एक्‍स्प्रेस), गोंदिया- मुंबई (सीएसटी) विदर्भ व गोंदिया -कोल्हापूर महाराष्ट्र एक्‍स्प्रेस यासह मुंबई-जालना जनशताब्दी एक्‍स्प्रेस, मुंबई-नांदेड तपोवन एक्‍स्प्रेस, पुणे-नांदेड सुपरफास्ट एक्‍स्प्रेस या मराठवाड्यातील प्रवाशांसाठी उपयोगी ठरणाऱ्या तीन गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांसाठी 15 ऑक्‍टोबरपासून आरक्षण करता येणार आहे.

 

मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या राज्यात अधिक आहे. मार्च महिन्यापासून या गाड्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर बंद झाल्याने अडचण निर्माण झाली होती. ती तब्बल सहा महिन्यानंतर पाचव्या अनलॉकमध्ये सुटली आहे. दसरा व दिवाळी या सणांच्या तोंडावर गाड्या सुरू होणार असल्याने प्रवाशांची सोय झाली आहे.

 

या गाड्या सुरू होणार
मुंबई-अमरावती एक्‍स्प्रेस, मुंबई-नागपूर (सेवाग्राम एक्‍स्प्रेस), मुंबई-गोंदिया (विदर्भ एक्‍स्प्रेस), पुणे-नागपूर सुपर फास्ट, पुणे-नागपूर (गरीबरथ एक्‍स्प्रेस), पुणे-भुसावळ, कोल्हापूर-गोंदिया (महाराष्ट्र एक्‍स्प्रेस), मुंबई-पुणे (डेक्कन एक्‍स्प्रेस), मुंबई-पुणे (इंटर सिटी), मुंबई-पुणे (सिंहगड), मुंबई-पुणे (प्रगती एक्‍स्प्रेस), मुंबई-लातूर, मुंबई-सोलापूर (सिद्धेश्वर एक्‍स्प्रेस), मुंबई-कोल्हापूर (महालक्ष्मी एक्‍स्प्रेस), पुणे-सोलापूर (हुतात्मा एक्‍स्प्रेस) आदी गाड्या 20 ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here