पुणे-सातारा महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार

the-burning-truck

सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – पुणे-सातारा महामार्गावर सारोळा (ता.भोर) येथे एका चालत्‍या ट्रकने पेट घेतला. ट्रकचे इंजिन गरम झाल्‍याने ट्रकने पेट घेतला. यामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

 

 

या विषयी अधिक माहिती अशी की, पुणे – सातारा महामार्गावरून (एमएच ०४ ईएल ८६४१) हा ट्रक कागदाची वाहतूक करत होता. यावेळी अचानक चालत्‍या ट्रकचे इंजिन गरम झाल्‍याने ट्रकने पेट घेतला. यामुळे सकाळी साडेसात वाजल्‍यापासूनच सातारा शहराच्या बाजुने मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

 

 

 

या महामार्गवर शनिवारी- रविवारी अथवा इतर सुट्टीच्या दिवशी महामार्गच्या सहापदरीकरणाच्या कामामुळे वाहतुक कोंडीचा प्रकार नेहमीच पाहावयास मिळतो. सारोळा उड्डाणपुलाचे काम अर्धवट असल्यामुळे व साईडपट्टीची दुरवस्था असल्यामुळे सकाळी साडेसात वाजल्यापासून सातारा बाजूकडे वाहतूक कोंडी होती. त्‍यातच महामार्गावर ट्रकने पेट घेतल्‍याने मोठी वाहतूक कोंडी झाली.

 

 

 

महामार्ग पोलिस सकाळपासून वाहतूक कोंडी सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करीत होते. दरम्‍यान महामार्ग पोलिस व राजगड पोलिसांनी आग विझवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here